नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना निधी मंजूर, कोणत्या विभागाला किती? जाणून घ्या

नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना निधी मंजूर, कोणत्या विभागाला किती? जाणून घ्या

नाशिकसह 'या' जिल्ह्यांना निधी मंजूर, कोणत्या विभागाला किती? जाणून घ्या

नाशिक विभागाच्या वार्षिक वित्त नियोजनाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित होते. नाशिकसाठी एकूण ९५० कोटी रुपायंचा निधी देण्यात आला आहेय त्यामध्ये दीडशे कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजुर करण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत कमी प्रमाणात महसूल आला तसेच केंद्राकडूनही काही निधी आला नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. नंदुरबार,धुळे,जळगाव आणि नगर या जिल्ह्यांचीही बैठक नाशिकमध्ये घेण्यात आली आहे. आपल्या विभागाला जास्त निधी मिळावा असे पालकमंत्र्यांना वाटणे सहाजिकच आहे. परंतु त्यातून आम्ही मध्यमार्ग काढला आहे. जिल्हा निधी नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात आल्याचे यावेळी अजित पवारांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्याला ४७० कोटी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्याचे शतकोत्तर वर्षे असल्यामुळे २५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच इतर कामांसाठी वाढीव निधीही देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागील वर्षी जळगाव जिल्ह्यासाठी ३७५ कोटी निधी देण्यात आला होता आता २५ कोटी वाढीव निधी देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यासाठी सर्वसाधारणमधून १३० कोटी देण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्याला मागिल वर्षी११५ कोटी निधी देण्यात आला होता. यावर्षी १५ कोटी पाठवून देण्यात आला आहे.

राज्य सरकार चॅलेंज फंडच्या निमित्ताने स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेत अव्वल येणाऱ्या जिल्ह्याला प्रोत्साहनपर रक्कम म्हणून ५० कोटी रुपये राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे.

First Published on: February 10, 2021 2:30 PM
Exit mobile version