गुजरात सीमेवर २४ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

गुजरात सीमेवर २४ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

नाशिक – गुजरातहून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. गुजरात सीमेलगत ठाणापाडा शिवारात सापुतारा ते नशिक महामार्गावर शुक्रवारी (दि.१) दुपारी नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला २३ लाख ७६ हजार रुपयांचा पान मसाला, गुटखा व ट्रक जप्त केला. ट्रकचालक संदीप मुंजेभाऊ गायकवाड (वय ३१, रा. मखमलाबाद, नाशिक), कुणाल संजय मेने (वय २४, रा. खर्डे, ता. देवळा, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

जिल्ह्यात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांंना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांनी कर्मचार्‍यांसह सापळा रचला. शुक्रवारी (दि.१) दुपारी गुजरात सीमेल्गत ठाणापाडा शिवारात सापुतारा ते नशिक महामार्गावर पोलिसांनी संशयित ट्रक (एमएच १५-एचएच २४१६)ची पाहणी केली. ट्रकमधील दोघांकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी गुटखा असल्याची कबुली दिली. ट्रक सुरगाणा पोलीस ठाण्यात आणत शहानिशा केली असता २३ लाख ७६ हजार रुपयांचा पान मसाला, सुगंधित तंबाखू आढळून आली. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून ट्रकसह मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: October 2, 2021 10:22 AM
Exit mobile version