प्रशांत किशोर यांचे आता मिशन महाराष्ट्र, विदर्भासाठी खास रणनीती!

प्रशांत किशोर यांचे आता मिशन महाराष्ट्र, विदर्भासाठी खास रणनीती!

निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Political Chanakya Prashant Kishore) आता वेगळ्या विदर्भाच्या चळवळीसाठी (Movement for seperate Vidarbha) खास स्ट्रॅटेजी आखत असल्याचं समोर आलं आहे. या खास स्ट्रॅटेजीसाठी २० सदस्यांना विदर्भात पाठवण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात आहे. त्यातच, आता या चळवळीत प्रशांत किशोर उतरल्याने या चळवळीला बळ मिळेल असं तज्ज्ञांकडून म्हटलं जात आहे. (Now Prashant Kishor’s special strategy for Mission Maharashtra Vidarbha)

हेही वाचा – Prashant Kishor : काँग्रेसमुळे माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब झाला, सोबत काम करणार नाही, प्रशांत किशोरनं फटकारलं

२०१४ च्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपसाठी काम केल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर, काँग्रेस, टीएमसीसह अनेक पक्षांसाठी प्रशांत किशोर यांनी काम केलं आहे. त्यांनी अनेक प्रयोग यशस्वी करून दाखवले असल्याने राजकीय चाणक्य म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतही प्रशांत किशोर यांनी चर्चा केल्या आहेत.

हेही वाचा – वेगळा विदर्भ आणि प्रकाशावरचा अंधार!

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. विविध पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून अनेकांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली आहे. मात्र, वेगळ्या विदर्भाचे घोंगडे अजूनही भिजतच आहे. त्यातच, प्रशांत किशोर आता या चळवळीत उतरल्याने या चळवळीला यश येण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, ८ सदस्य ३ दिवसांपूर्वी, तर १२ सदस्य दोन दिवसांपूर्वीच विदर्भात दाखल झाले आहेत. तर, विदर्भाच्या चळवळीची रणनीती तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मत जाणून घेण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच, राजकीय, सामाजिक, औद्योगिक संघटनांसह विदर्भवाद्यांशीही त्यांची चर्चाही सुरू झाल्या आहेत.

First Published on: July 7, 2022 11:10 AM
Exit mobile version