केशरी रेशनकार्ड नागरिकांनाही गहू ८ रुपये, तर तांदूळ १२ रुपये किलोने

केशरी रेशनकार्ड नागरिकांनाही गहू ८ रुपये, तर तांदूळ १२ रुपये किलोने

एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्तीमागे देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यांना ८ रुपये प्रती किलो गहू आणि १२ रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती देखील केली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या ३ कोटी ८ लाख एपीएल शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होईल. त्यासाठी सुमारे २५० कोटी खर्च येणार असून मे आणि जून या महिन्यासाठी हे धान्य दिले जाईल. सध्या जे धान्य केंद्र सरकारकडून मिळते त्या व्यतिरिक्त १ लाख ५४ हजार २२० मेट्रिक टन धान्याची मागणी यासाठी करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान आधारभूत किंमतीच्या दराने धान्य देण्याबाबत केंद्राचे जे धोरण आहे त्याला अनुसरूनच सवलतीच्या दरात धान्य मिळावे, अशी मागणी पंतप्रधानांना करण्यात आली आहे.

दरम्यान, पांढरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांसाठीही लवकरच महत्त्वाची घोषणा करण्यात येणार असल्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत.

First Published on: April 8, 2020 7:19 AM
Exit mobile version