गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळ यांनी घेतले गणपतीचे दर्शन

आज गणेश चतुर्थी आणि आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाने सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सवा सोबतच इतरही सण साजरे करण्यावर निर्बंध होते. पण या वर्षी मात्र सर सण साजरे कारण्यावरील निर्बंध हटवल्याने सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा गणरायाचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. त्याचेच हे काही फोटो.

1) मागील दोन वर्षांननंतर मुंबई सह राज्यभरातच गणेशेत्सवाचा आनंद दिसतो आहे. उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात आज गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची घराघरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. माझंगाव मधील अंजीरवाडी येथील गणेश मूर्तीची सुद्धा पूजा करण्यात आली.

2) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा गणपतीची विधिवत पूजा केली.

3) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या शासकीय निवास्थानी वर्षा बंगल्याबर गणेशाच्या मूर्तीची प्राणपतिष्ठापना केली. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंब सोबत बाप्पाची पूजा केली.

5) तराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा मुंबईतील माझगाव येथील अंजीरवाडी येथे जाऊन तिथल्या गणपतीचे दर्शन घेतले.

5) छगन भुजबळ दरवर्षी गणेश चतुर्थीला माझगाव इथल्या अंजीरवाडीमध्ये येऊन बाप्पाचं दर्शन घेतात, यावेळी छगन भुजबळ यांचे भाऊ सुद्धा उपस्थित होते.

First Published on: August 31, 2022 5:52 PM
Exit mobile version