सलाम ‘या’ मावळ्याला; शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ‘तो’ भर पावसात उभा राहिला

सलाम ‘या’ मावळ्याला; शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ‘तो’ भर पावसात उभा राहिला

सलाम 'या' मावळ्याला; शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 'तो' भर पावसात उभा राहिला

शिवभक्ती काय असते याची प्रचिती कालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्थ अजित पवार यांच्या प्रचार सभेत आली. भर पावसात सर्व कार्यकर्ते निवारा शोधत पावसापासून आपला बचाव करत होते. परंतु, एक शिवभक्त स्टेजवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे संरक्षण करत होता. शेखर लोखंडे असे या तरुणाचे नाव आहे. स्टेजवरील शिवाजी महाराजांचा पुतळा भिजू नये म्हणून तो छत्री घेऊन पुतळ्याभोवती उभा राहीला. जवळपास अर्धा तास ते पाऊन तास मुसळधार पाऊस पडला. तितकावेळ शेखर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती छत्री घेऊन उभा राहिला.

शेखरचे सर्वत्र कौतुक

शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांची पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ निगडी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. उदयनराजे येणार असल्याने कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पदाधिकाऱ्यांचे भाषण सुरू झाले आणि तेवढ्यात ढग दाटून आले. काही मिनिटांतच पाऊसाने जोरदार सुरुवात केली. काही मिनिटे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर तो थांबला. परंतु, पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाटसह आणि लखलखाटासह पावसाने हजेरी लावली. सर्व कार्यकर्ते मिळेल त्या निवाराच्या दिशेने धावत होते. स्टेजवरील मंडळी तेथील ताडपत्रीचा वापर करत स्वतःला पावसापासून बचाव करत असल्याचे पाहायला मिळाले. परंतु, स्टेजवरील शिवाजी महाराजांची प्रतिमा सुरक्षित राहावी, यासाठी शेखर लोखंडे हा तरुण छत्री घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती उभा राहीला. त्यामुळे शिवाजी महाराजांची प्रतिमा सुरक्षित राहिली. शेखरच्या या कामगिरीमुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

First Published on: April 14, 2019 3:34 PM
Exit mobile version