राज्यातील आणखी एका सहकारी बॅंकेचा परवाना रद्द; RBI ची कारवाई

राज्यातील आणखी एका सहकारी बॅंकेचा परवाना रद्द; RBI ची कारवाई

रिझर्व्ह बँक

राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील कराड जनता बँकेचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेच्या या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

यावेळी उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँक (आरबीआय) केली आहे. यासह बँकेची जी सध्याची स्थिती आहे, त्यात बँक ग्राहकांची देणी देण्यात किंवा व्यवहार करण्यास असमर्थ असल्याचे आरबीआयने म्हटंल आहे. आजपासून या बँकेला व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

आजपासून या बँकेला व्यवहार करण्यात मनाई करण्यात आली आहे. आरबीआयने वसंतदादा सहकारी बँकेवर कारवाईसंदर्भात एक पत्र जारी केलं. या पत्रात अनेक आरोप देखील केले गेलेत. या पत्रातच बँक ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात असमर्थ असल्याचा दावाही करण्यात आला आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर देखील ठेवीदारांची ५ लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. त्यामुळे या बँकेतील ९९ टक्के खातेदारांचे पैसे परत दिले जाणार आहेत. आरबीआयने महाराष्ट्राच्या कमिशनर फॉर कॉर्पोरेशन आणि रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीला आदेश दिले आहे. या दिलेल्या आदेशानुसारच आता वसंतदादा नागरी बँकेचे कामकाज बंद केले जाणार आहे.

यापूर्वी आरबीआयने मुंबईतील CKP सहकारी बँक, कोल्हापूरमधील सुभद्रा लोकल एरिया बँक, साताऱ्यातील कराड जनता बँकेचे परवाने रद्द केले होते. मात्र यानंतर आता उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्याचे समोर आले आहे.

First Published on: January 12, 2021 12:59 PM
Exit mobile version