आमच्या गावाचा वेगळा देश करा, राज्यातील ‘या’ गावाची अजब मागणी

आमच्या गावाचा वेगळा देश करा, राज्यातील ‘या’ गावाची अजब मागणी

राज्याची राजधानी मुंबईजवळच्या एका गावाने आमच्या गावाला वेगळा देश करा, अशी मागणी केली आहे. सरकारचे, प्रशासनाचे गावाकडे दुर्लक्ष झाले असून गावात कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने गावकऱ्यांनी अशी मागणी केली आहे. हे गावा भिवंडी तालुक्यात गुणेशपुरीतील पलाट पाडा आहे. गावात अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून काही हालचाली दिसत नसल्याने गावकऱ्यांनी अशी मागणी केली आहे.

गावात रस्ता नसल्याने ये जा करण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. तसेच गावा शेजारी असलेल्या तलावात पाईपलाईन टाकून वसई महापालिकेला पाणी पुरवण्यात येते. मात्र, या गावातील नागरिकांसाठी पाईपलाईन नाही. आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या या पाड्यात आजपर्यंत आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी किंवा डॉक्टर फिरकला नसल्याचे इथल्या नागरिकांनी सांगीतले.

या पाड्यात आजपर्यंत वीज पोहोचलेली नाही. सायंकाळ झाली की लोकांना अंधारात रहावे लागते. इथल्या लहान मुंलांची संख्या 20 ते 22 आहे. अंगणवाडी आणि शाळा या गावात नाही. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात न्यायचे असल्यास झोळी किंव होडींचा उपयोग करावा लागतो.

गावच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना श्रमजीवी संघटनेच्या प्रमोद पवार यांनी माहिती दिली आहे. आदिवासी पाड्यावर सुविधांचा अभाव आहे. बोट चालवून मुलांना शाळेत सोडले जाते. रस्ता नसल्याने मुलं शाळेत जात नाहीत, त्यांचे शालेय नुकसान होत असल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

First Published on: August 1, 2022 2:33 PM
Exit mobile version