‘धनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते’

‘धनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते’

पंकजा मुंडे राजकारण सोडणार होत्या!

‘धनंजय मुंडे हे तोडपाणी करणारे नेते आहेत’, असा आरोप महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. मुंडे भाऊ-बहिणमधील वाद सर्वश्रुत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘आपण पहिल्या बॉलला विकेट घेणार’, असे म्हणत पंकजा मुंडे यांना टोमणा मारला होता. याच टोमण्याला पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी शुन्यावर बाद होणारी खेळाडू नाही’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘बंगळूर एक्सप्रेसला घटनांदूर येथे थांबा मिळावा’, अशी मागणी सुरु होती. पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रयत्नामुळे बंगळूर एक्सप्रेसला घटनांदूर येथे थांबा मिळाला. मुंडे भगिनींनी घटनांदूर येथे रेल्वे स्थानकावर हिरवा झेडा दाखवून बंगळूर एक्सप्रेसचे स्वागत केले. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थानी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपले बंधू धनंजय मुंडे यांच्यावर कडाडून टीका केली. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर टीका करताना पहिल्या बॉलला विकेट घेणार असे म्हटले होते. धनंजय यांच्या याच वक्तव्याला पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंकजा म्हणाल्या की, ‘मी शुन्यावर बाद होणारी खेळाडू नाही. काही दिवसांपूर्वी मी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले होते, त्यावेळी मी पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला होता. त्यामुळे मी शुन्यावर बाद होणारी खेळाडू नाही’.

‘मुंडे साहेबांचे नाव जिवंत ठेवणाऱ्यांच्या मागे उभे राहा’

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मुंडे साहेबांचे आजही नाव निघालं, तर देशातील सर्व राजकारण ढवळून निघते. त्यामुळे साहेबांच्या नावाचे राजकारण करणाऱ्यांच्या मागे जायचे नाही. तर मुंडे साहेबांचे नाव जिवंत ठेवणाऱ्यांच्या मागे उभे राहा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. एकेकाळी ज्या जिल्ह्यांमध्ये सहा आमदारांपैकी पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, त्यावेळी कुठल्याही प्रकारचे विकासाचे कामे झाले नाहीत. आम्ही विकासाचे कामे करतो, पण आमच्या भावांना मात्र तोडपाणी करण्याचे काम असते’. अशाप्रकारे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.


हेही वाचा – पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना ‘धस’का दम!

First Published on: January 26, 2019 4:03 PM
Exit mobile version