सतत चळवळीत काम करणार्‍या नेत्याला महाराष्ट्र मुकला… पंकजा मुंडे यांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली

सतत चळवळीत काम करणार्‍या नेत्याला महाराष्ट्र मुकला… पंकजा मुंडे यांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. रविवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास मुंबई- पुणे एक्स्प्रेस-वेवर त्याच्या गाडीचा अपघात झाला. विनायक मेटे यांच्या निधनानंतर राजकीय स्तरातून दुःख व्यक्त केले जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील विनायक मेटे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहेत.

बीडच्या माजी पालकमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शोक व्यक्त करत लिहिलंय की, “दुर्दैवी अपघातात निधन झाल्याने विनायकराव मेटे यांच्यासारख्या सतत चळवळीत काम करणार्‍या नेत्याला महाराष्ट्र मुकला‌ आहे. त्यांना 22-23 वर्षं पाहते आहे. कुठलीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना राजकारणात स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्याच्या जीवावर उभा असणारा मराठा चळवळीतील नेता हरपला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोण आहेत विनायक मेटे थोडक्यात?
विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. तसेच, अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. याशिवाय, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आमदार राहिले होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते.


हेही वाचा :तळागाळातील मराठा समाजाला न्याय देणारे नेतृत्व आज हरपले… चंद्रकांत पाटील यांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली

First Published on: August 14, 2022 10:10 AM
Exit mobile version