गणपतीची वर्गणी न दिल्याने आई-मुलांना टोळक्याची बेदम मारहाण

गणपतीची वर्गणी न दिल्याने आई-मुलांना टोळक्याची बेदम मारहाण

संग्रहित छायाचित्र

गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने आई आणि मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तक्रार नोंदवण्यात आली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. रमेश देवराम चौधरी वय-३७ यांनी फिर्याद दिली आहे.


हेही वाचा- आजची मध्यरात्र भारतासाठी ऐतिहासिक!


असा घडला प्रकार 

आरोपी सागर घडसिंग आणि फिर्यादी हे एकाच कॉलनीत राहतात. तर फिर्यादी यांचे त्याच परिसरात माताजी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. कॉलनीत ओम साई गणपती मंडळ असून त्याची ५ हजार वर्गणी का देत नाहीत म्हणून मध्यरात्री आरोपीने फिर्यादी यांच्या बंद दुकानाची जाळी जोरजोरात वाजवत होता. तेव्हा, फिर्यादी आणि जखमी भाऊ मुकेश चौधरी, आई जमनीबाई चौधरी हे त्याला विरोध करत होते.

यावेळी सागरने दहा जणांचे टोळके बोलावले त्यांच्या हातात लाकडी दांडके होते. तर सागरच्या हातात लोखंडी पाईप होता, तुम्ही आम्हाला वर्गणी का देत नाही थांब तुला जीवे ठार मारतो, असे म्हणून लोखंडी पाईपाने फिर्यादी यांचा भाऊ मुकेशच्या डोक्यात मारला यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर टोळक्याने लाकडी दांडक्याने आईला आणि फिर्यादी यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान हा घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून बेदम मारहाण केल्याचा स्पष्ट दिसत आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

First Published on: September 6, 2019 1:19 PM
Exit mobile version