घरदेश-विदेशआजची मध्यरात्र भारतासाठी ऐतिहासिक!

आजची मध्यरात्र भारतासाठी ऐतिहासिक!

Subscribe

शनिवारची पहाट श्रीहरिकोटा शास्त्रज्ञांसाठी प्रचंड आव्हानात्मक असणार आहे!

गेल्या दीड महिन्यापासून तमाम भारतीय आणि जगभरातले भारतप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहात आहेत, तो क्षण आज मध्यरात्रीनंतर म्हणजेच शनिवारी पहाटे १.३० ते २.३० दरम्यान येणार आहे. कारण यादरम्यान भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चांद्रयान-२ मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे. चांद्रयान २ चंद्रावर उतरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरणार आहे. २२ जुलै रोजी श्रीहरीकोटा केंद्रावरून चांद्रयान २ ने आवकाशात झेप घेतली होती. तेव्हापासून आजपर्यंत चांद्रयानाने अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत आता चंद्राच्या सर्वात जवळच्या कक्षेत प्रवेश केला आहे. इस्रोने यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला या ऐतिहासिक क्षणासंदर्भात माहिती दिली आहे.

- Advertisement -

शेवटचा तास शास्त्रज्ञांसाठी आव्हानात्मक

दीड महिन्यांपासून श्रीहरीकोटा इथल्या डीप स्पेस सेंटरमध्ये चांद्रयान २च्या संपूर्ण प्रवासाचं नियंत्रण केलं जात आहे. प्रतितास २१ हजार ६०० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती. या प्रवासात आत्तापर्यंच चांद्रयानाने २१ लाख ८४ हजार किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. आता शेवटच्या काही किलोमीटरचा प्रवास शिल्लक असून मध्यरात्रीनंतर चांद्रयान २चा विक्रम लँडर प्रग्यान रोव्हरसोबत चंद्रावर उतरेल. या प्रक्रियेमधला सगळ्यात आव्हानात्मक भाग हा रोव्हर चंद्रावर उतरल्यानंतरचा असेल. १.३० ते २.३०दरम्यान चांद्रयान २ चंद्रावर उतरल्यानंतर तीन तासांनी म्हणजेच ५.३० ते ६.३० या दरम्यान चांद्रयान २ असलेला विक्रम लँडर प्रग्यान रोव्हरपासून वेगळा होणार आहे. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडावी म्हणून डीप स्पेस सेंटरमध्ये शास्त्रज्ञ डोळ्यांत तेल घालून या संपूर्ण प्रक्रियेचं नियंत्रण करत आहेत.


हेही वाचा – चांद्रयान-२ ने काढलेले चंद्राचे आणि पृथ्वीचे फोटो

चांद्रयान १च्या यशानंतर ११ वर्षांनी चांद्रयान २

चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी याआधी भारताने २००८ साली चंद्रयान १ चंद्रावर उतरवले होते. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून ते लाँच करण्यात आले होते. यावेळी १० महिने आणि ६ दिवसांचा प्रवास करून ते चंद्रावर उतरले होते. यावेळी चांद्रयान १ने चंद्राच्या विविध कक्षांमध्ये बराच काळ भ्रमण करून महत्वाची माहिती मिळवली होती. आता चांद्रयान २ थेट चंद्रावर उतरून तिथल्या भूभागाचा अभ्यास करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -