पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट, गोपीचंद पडळकरांनी सांगितलं भेटीमागचं कारण

पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट, गोपीचंद पडळकरांनी सांगितलं भेटीमागचं कारण

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आज मंत्री शंभूराज देसाई यांच्या भेटीला गेले होते. यावरून राज्यात घमासान सुरू झाले आहे. दरम्यान, या भेटीचं भाजपा नेते गोपिचंद पडाळकर यांनी कारण दिलं आहे.

रोहित पवार हे विधानसभेचे सदस्य आहेत. मुंबई क्रिकेट मंडळाचे अध्यक्षही तेच झाले. त्यामुळे पार्थ नाराज असू शकतात. घरातून, आजोबांकडून अन्याय होत असेल म्हणून शंभूराज देसाईंची पार्थ पवारांनी भेट घेतली असेल, असं गोपिचंद पडाळकर म्हणाले. पार्थ पवार यांनाही राजकारणात स्थिर व्हायचं असेल पण भेट का घेतली? काय चर्चा झाली हे मला माहीत नाह, असंही गोपिचंद पडाळकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, यावरून विरोधकांनी टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. मात्र, हे आरोप गोपिचंद पडाळकर यांनी फेटाळून लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा हा विकासकामांच्या उद्घाटनाचा असून यास वेगळं वळण देऊ नये. गेल्या ८ वर्षांत विकास करण्यात मोदी सरकार अग्रेसर आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या मुंब७ई दौऱ्याला दुसरा कोणता रंग देऊ नये. विकासकामाचा शुभारंभ आज होतोय, सकारात्मक बदल होतोय. भाजपा कायम निवडणुकीच्या तयारतीच असते. मोदींनी विरोधकांना दुबळे न समजता कामाला लागण्याचा संदेश दिला आहे, असं गोपिचंद पडळकर म्हणाले.

तसंच, थोड्या मतांच्या फरकाने आम्ही बारामतीची जागा हरलो. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा ४८ जागा असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

First Published on: January 19, 2023 3:24 PM
Exit mobile version