ऑनलाईन बालदिनाच्या निवड समितीमध्ये राज्य मंडळाच्या शिक्षकांचा सहभाग

ऑनलाईन बालदिनाच्या निवड समितीमध्ये राज्य मंडळाच्या शिक्षकांचा सहभाग

बालदिनानिमित्त आयोजित स्पर्धामध्ये निवड समितीमध्ये सीबीएसई, आयसीएसई, आयबी मंडळाच्या मुख्याध्यापकांचीन निवड करण्यात आली होती. त्यामुळे राज्य मंडळाच्या शिक्षकांनी त्यांना डावलल्याची भूमिका मांडली होती. याची दखल घेत शिक्षण विभागाकडून संबंधित निर्णयात बदल करत निवड समितीमध्ये राज्य मंडळातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख यांचा समावेश करावा असे म्हटले आहे. या बाबतीतीतल शुद्धीपत्रक ही शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहे.

८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत बाल दिनानिमित्त विविध स्पर्धा होणार असून या स्पर्धांसाठी विजेत्यांच्या निवडीसाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यामध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख नेमतांना सीबीएसई, आयसीएसई, आय बी अभ्यासक्रम असलेल्या शाळेमधील असावेत असा उल्लेख केला होता. राज्य बोर्डाचा कोणताही उल्लेख केला नव्हता. यामुळे राज्यातील मराठी शाळांमधील जवळपास ५ लाख शिक्षकांचा शासनाने अपमान केला आहे, मराठी शाळांना दुय्यम दर्जा दिल्याची भावना शिक्षक व्यक्त करत होते. एसएससी बोर्डाच्या राज्यात ९५ टक्केहून अधिक शाळा आहेत अशा एसएससी बोर्डाला कमी लेखणे हे संतापजनक असून तातडीने या शासन परिपत्रकात बदल करावा अशी मागणी संघटनांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर या निर्णयात शिक्षण विभागाकडून बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना या स्पर्धांसाठी एससीईआरटीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. याच संकेतस्थळावर उपक्रमा संदर्भातील साहित्यही ते अपलोड करू शकणार असल्याची माहिती निर्णयात नमूद करण्यात आली आहे.

First Published on: November 12, 2020 8:05 PM
Exit mobile version