सत्तासंघर्ष| ….अन् बाळासाहेबांचा फोटो हटवून लावला नारायण राणेंचा फोटो; बदललेल्या फोटोंची चर्चा

सत्तासंघर्ष| ….अन् बाळासाहेबांचा फोटो हटवून लावला नारायण राणेंचा फोटो; बदललेल्या फोटोंची चर्चा

सिंधुदुर्गः सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक यंदा चांगलीच चर्चेत राहिली. विशेष ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपाऐवजी राणे विरुद्ध ठाकरे अशी रंगलेली पाहायला मिळाली. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीनं सगळ्यांचे लक्ष वेधले. जिल्हा बँक निवडणूक ही तशी पाहिली तर इतर जिल्हा बँकांप्रमाणे निवडणूक प्रक्रिया, मात्र यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजली आणि पर्यायाने चर्चेत राहिली.

या निवडणुकीनं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. जिल्हा बँक निवडनूक प्रचार झाला, निवडणूक झाली, अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडही झाली. आणि लक्ष वेधलं ते जिल्हा बँक अध्यक्ष केबिनमधील हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवार आदी नेत्यांच्या उतरलेल्या फोटोंनी आणि नव्याने स्थानापन्न झालेल्या फक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोने आणि नवीन एका चर्चेला तोंड फुटले.

सत्ता हा शब्द खूप अद्भुत आहे. ज्याच्याकडे आहे त्याचा बोलबाला असतो. माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या शिवसेना प्रवेशानंतर जिल्हा बँकेमधील चित्र बदलले. तसेच जिल्हा बँक अध्यक्ष केबिनमधील भिंतीवरील फोटो ही बदलले. निवडणूक झाली आणि सत्ता बदलली आणि दोन दिवसांपूर्वी नवीन अध्यक्ष -उपाध्यक्ष स्थानापन्न झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा किंगमेकर ठरले आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सहीत इतर सर्व फोटो हटवण्यात आले. फक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल झाले होते. संतोष परब हल्ला प्रकरणात राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना गेल्या अनेक दिवसांपासून राणे नॉटरिचेबल होते, नितेश राणे कुठे आहेत? असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जात होता. गुरुवारी नितेश राणे कणकवलीत दाखल होताच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राणेंना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले, त्यानंतर नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रवेश केला होता.


हेही वाचा : १५ दिवसांनंतर नितेश राणे प्रकटले

First Published on: January 15, 2022 11:55 AM
Exit mobile version