ठाकरे कुटुंबाच्या मालमत्तेविरोधात हायकोर्टात याचिका; पुढील सुनावणी 16 नोव्हेंबरला

ठाकरे कुटुंबाच्या मालमत्तेविरोधात हायकोर्टात याचिका; पुढील सुनावणी 16 नोव्हेंबरला

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबा मालमत्ता जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालमत्तेबाबत आरोप करत ठाकरेंच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दादर परिसरात राहणाऱ्या गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. भिडे यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे बुधवारी यावर सुनावणी झाली. (pil against uddhav thackeray and family regarding illegal assets)

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भिडे यांनी ठाकरेंचं उत्पन्न आणि त्यांची संपत्ती याचा ताळमेळ लागत नसल्यानं याप्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केल्याचे समजते. या याचिकेच्या सुनावणीपूर्वी गौरी भिडे यांची याचिका स्वीकारण्यास कुणीही वकील तयार होत नव्हते. त्यामुळे त्या स्वत:चं कोर्टापुढे युक्तिवादासाठी उभ्या राहिल्या. यावेळी त्यांच्या याचिकेवर उच्च न्यायालय कार्यालयाने काही आक्षेप घेतल्याने ते दूर करण्याचे निर्देश दिले असून, न्यायालयाने त्यांना 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 16 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

याचिकेत काय म्हटले आहे ?

याचिकाकर्त्या गौरी भिडे कोण?

सामना आणि मार्मिक प्रकाशित करणारा ठाकरे कुटुंबियांच्या मालकीचा ‘प्रबोधन’ प्रकाशनचा छापखाना जिथे आहे, त्याच्या शेजारीच गौरी भिडे यांच्या आजोबांचा ‘राजमुद्रा’ प्रकाशन हा छापखाना होता.


हेही वाचा – एमसीए निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे, पवार आणि फडणवीस एकाच मंचावर; चर्चांना उधाण

First Published on: October 19, 2022 10:53 PM
Exit mobile version