घरक्रीडाएमसीए निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे, पवार आणि फडणवीस एकाच मंचावर; चर्चांना उधाण

एमसीए निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे, पवार आणि फडणवीस एकाच मंचावर; चर्चांना उधाण

Subscribe

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर एकत्र आलेले पाहायला मिळाले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक गुरुवारी होणार आहे. एमसीएच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार आणि शरद पवारांच्या पॅनलची बैठकी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आलेले पाहायला मिळाले. (Mumbai Cricket Election Sharad Pawar Ekanth Shinde Devendra Fadnavis)

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर एकत्र आलेले पाहायला मिळाले.

- Advertisement -

एमसीएसच्या कार्यकारिणीची गुरूवारी निवडणूक होणार असून, या निवडणुकीपर्वी हे तीन महत्वाचे नेतेमंडळ एकत्र एका मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनल उभे केले आहे. तसेच, शेलार आणि पवारांच्या पॅनलविरोधात क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे पॅनल निवडणूक लढवणार आहेत.

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी काळे आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व 1983च्या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य संदीप पाटील यांच्यात निवडणूक होणार आहे. एमसीएचे एकूण 380 मतदार आहेत. त्यामध्ये मैदान क्लब्स 211, ऑफिस क्लब्स 78, स्कूल कॉलेज क्लब्स 40 आणि माजी कसोटीवीर 51 असे मतदार आहेत. अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील यांच्यात होणाऱ्या लढतीत कोण विजयी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -