समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी राज्यपाल कोश्यारींकडे केले दुर्लक्ष

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी राज्यपाल कोश्यारींकडे केले दुर्लक्ष

मुंबई आणि नागपूरकरांसाठी महत्वाचा असलेल्या हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. परंतु, या लोकार्पण सोहळ्यादरम्यान स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यपालांकडे का दुर्लक्ष केले असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Pm Modi And Governor Koshyari Came Face To Face On Stage at Samruddhi Highway)

हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी स्टेजवर गेले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मात्र, लोकार्पण सोहळ्यासाठी स्टेजवर आले तेव्हा पंतप्रधान मोदींनी राज्यपाल कोश्यारींकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. याबाबतचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सुमारे ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. यामध्ये अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर तप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे कौतुक केले आहे. “महाराष्ट्राला आज 11 विविध प्रकल्प मिळाले. महाराष्ट्रातील डबल इंजिनचं सरकार किती वेगाने काम करतय याचं हे उत्तम उदाहरण आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील अंतर कमी होईलचं पण हा महामार्ग महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांना आधुनिक कनेक्टिव्हीटीने जोडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना, पर्यटकांना आणि विविध धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भक्तांना लाभ होणार आहे, रोजगार उपलब्ध होणार आहे”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिंदे फडणवीस सरकारचे कौतुक केले आहे.


हेही वाचा – समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींची सभा आणि त्यानंतर ‘या’ भागाचं मोठं नुकसान; वाचा नेमकं काय घडलं?

First Published on: December 11, 2022 9:51 PM
Exit mobile version