घरताज्या घडामोडीMaharashtra Politics : उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची ऑफर?

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची ऑफर?

Subscribe

सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेतील अनेक खासदार, आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुंबई : सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेतील अनेक खासदार, आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला मुख्यमंत्री करतो, पुन्हा या असे मलाही सांगितले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. (Maharashtra Politics Uddhav Thackerays offer of Chief Ministership to Fadnavis)

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला. त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “त्याच्यात सत्यता, वस्तुस्थिती आहे. आम्ही बाहेर गेलो तेव्हा त्यांनी तसे प्रयत्न केले. तुम्हाला मुख्यमंत्री करतो, पुन्हा या असे मलाही सांगितले होते. पण मी मुख्यमंत्री होण्यासाठी तसा निर्णय घेतला नव्हता. कारण विचारांची फारकत झाली होती. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली जाते तेव्हा वैचारिक भूमिका घेऊन गेलो”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

शिवाय, “त्यांनी दिल्लालाही फोन केला होता. तुम्ही त्यांना का घेताय, आम्ही सगळी शिवसेना घेऊन येतो, असे ते म्हणाले होते. पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती. 50 लोक माझ्यासोबत होते. फडणवीस जे बोलले आहेत त्यात सत्यता आहे. मी अजून खूप काही बोलू शकतो, पण बोलणार नाही”, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“उद्धव ठाकरे यांचा मला सकाळी फोन आला. त्यावेळी त्यांनी बंडखोरांना का सोबत घेत आहात? शिंदेंना एखादं पद तुम्ही का देत आहात? असे प्रश्न विचारले. संपूर्ण शिवसेना पक्ष तुमच्यासोबत घेऊन येतो, अशी ऑफर तेव्हा ठाकरेंनी दिली होती. उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली. मिलिंद नार्वेकरांनी मला फोन लावला, मग उद्धव ठाकरे बोलले. पण मी उद्धव ठाकरेंना सांगितलं वेळ निघून गेली आहे. या निर्णयाशी वरिष्ठांशी बोला, असा सल्ला मी त्यांना दिला. माझ्या पातळीवर हा निर्णय संपला असल्याचे मी ठाकरे यांना सांगितले. जे सोबत आले त्यांच्याशी बेईमानी करणार नाही, असेही मी त्यांना स्पष्ट सांगितले होते”, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Shinde : ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्ट मत, म्हणाले…

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -