PM Narendra Modi उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

PM Narendra Modi उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे.  या पंतप्रधान उद्या (26 ऑक्टोबर) शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात करणार आहे.  या दौऱ्यात पंतप्रधान 86 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील आणि निळवंडे धरणाचे जलपूजल करून राज्यात कालव्याचे जाळे पसरवणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

महाराष्ट्र दौरा संपल्यानंतर पंतप्रधानां गोव्याला जाणार आहे. गोव्यात पहिल्यांदाच होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. गोव्यातील मडगाव येथे राष्ट्रीय खेळाचा उद्घाटन सोहळा होणार असून यात देशातील 10000 पेक्षा अधिक खेळाडू 28 ठिकाणी 43हून अधिका क्रीडाशाखांमध्ये सहभागी होणार आहेत.

निळवंडे धरणाचे जलपूजन व डाव्या काठाचे कालव्याचे जाळे 

शिर्डी संस्थानचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान निळवंडे धरणाच्या डाव्या काठाचे (85 किमी) कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक अशा एकून 182 गावांना याचा लाभ होणार असून याचा फायदा हा पाण्याचे पाइप वितरण जाळे सुकर होईल. या धरणासाठी सुमारे 5177 कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जात आहे.

हेही वाचा – राज्यात मराठा आरक्षणासाठी उठाव होण्याची गरज – अंबादास दानवे

असा आहे पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा

पंतप्रधान उद्या दुपारी एक वाजताच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचतील. यानंतर पंतप्रधान प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन करुन, मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत. दुपारी दोन वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि धरणाच्या कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. तद्नंतर 3.15 च्या सुमारास, श्री मोदी शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायु यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

हेही वाचा – 2024 मध्ये पुन्हा BJP सत्तेत येणार नाही; कुणी म्हटले असे? वाचा सविस्तर

नवीन दर्शन रांग संकुला सोयी सविधांनी सज्ज

पंतप्रधान शिर्डी संस्थान येथील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन होणार आहे. हे नवीन इमारतीत विविध सुविधांनी तयार करण्यात आले असून या इमारतीमध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह अनेक वेटिंग हॉल, क्लोक रूम, स्वच्छतागृहे, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ चा शुभारंभ होणार आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ होईल.

हेही वाचा – “अजित पवारांना चक्की पिसायला पाठवणारे आता…”, उद्धव ठाकरेंचा भाजपला अप्रत्यक्ष टोला

विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

या दौऱ्यादरम्यान अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. यात कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी) करणार आहेत.  जळगाव ते भुसावळ जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी), NH-166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा आदि प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधाना करणार असून माता व बाल आरोग्य शाखेची पायाभरणी, आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप करतील.

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी उपोषण पुढे सुरूच ठेवावे, पण त्यांनी…; जरांगे पाटलांकडून संभाजीराजेंची विनंती मान्य

 

First Published on: October 25, 2023 7:41 PM
Exit mobile version