घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी उपोषण पुढे सुरूच ठेवावे, पण त्यांनी...; जरांगे पाटलांकडून संभाजीराजेंची विनंती...

मराठा आरक्षणासाठी उपोषण पुढे सुरूच ठेवावे, पण त्यांनी…; जरांगे पाटलांकडून संभाजीराजेंची विनंती मान्य

Subscribe

जालना : मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हटले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगताे की, माझ्‍या रक्‍तातील शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्‍न साेडवणारच. पण मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला 40 दिवसांचा वेळ मंगळवारी (24 ऑक्टोबर) संपला. त्यामुळे जरांगे पाटलांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे आजपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं की, उपोषण पुढे सुरूच ठेवावे. परंतु त्यांनी पाणी तरी प्यावे. संभाजीराजे छत्रपतींची ही विनंती जरांगे पाटलांनी मान्य करत पाणी प्यायले. (The hunger strike for Maratha reservation should continue, but they Sambhaji Raje Chatrapati request was accepted by Manoj Jarange Patil)

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे आणि म्हणून त्यांना आज भेटायला आलो आहे. शिवाजी महाराजांचे वंशज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानमध्ये 1902 ला बहुजन समाजाला 50 टक्के पहिलं आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये अनुसुचित जाती-जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता आणि मी स्वत: 2007 पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज गरीब मराठा समाज बाहेर फेकला गेला आहे. त्यांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सरकारने शब्द पाळला नाही, असं सांगत जरांगे पाटलांचं पुन्हा आमरण उपोषण सुरू

2013 दरम्यान आम्ही पहिल्यांदा आझाद मैदानात मोठं आंदोलन केलं होतं. आम्ही सर्वांनी आमरण उपोषण केलं होतं. त्यामुळे उपोषणाचा तो प्रसंग मी अनुभवला आहे. माझा जन्म राजघराण्यात झाला. त्यामुळे मला सुख जास्त मिळालं. जरांगे पाटील गरीब घरात जन्मला आले. ते रांगडे आहेत, पण शरीर एकच असतं. जरांगे पाटलांनी आताच आमरण उपोषण सुरू केलं तर असं नाही. त्याची धडपड आधीपासूनची आहे, हे बोलताना संभाजीराजे छत्रपतींना कंठ दाटून आला.

- Advertisement -

उपोषणाच्यावेळी मी चार दिवस पाणी प्यायलो नसल्यामुळे मी हतबल झालो होतो. त्यामुळेच मला जरांगे पाटलांची फार चिंता आहे, काळजी वाटते. छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून माझीही काही जबाबदारी आहे. जो समाजासाठी लढतो, जेव्हा समाज अडचणीत असताना लढतो, त्याला ताकद देण्याचं काम छत्रपती घराण्याचं असतं. म्हणूनच मी आज जरांगे पाटलांसाठी धावपळत याठिकाणी आलो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मनापासून आम्हाला तुमची काळजी आहे. त्यामुळे एकच विनंती आहे. पाणी तरी प्या.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेबद्दल मनोज जरांगेंनी उपस्थित केली शंका, म्हणाले…

छत्रपतीच्या घरातील व्यक्ती म्हणून हे सांगण्याचा जास्त नाही, पण माझा थोडा अधिकार आहे. तुम्ही आमरण उपोषण करा. पण पाणी तरी प्या. त्यानंतर उपोषण सुरूच ठेवा. माझी हातजोडून विनंती आहे, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. संभाजीराजे अत्यंत भावनिक झाले होते. उपोषण स्थळावरून जात असताना त्यांनी जरांगे पाटलांच्या खांद्यावर हात ठेवला आणि काळजी घेण्यास सांगितले. संभाजीराजे छत्रपती उपोषण स्थळावरून गेल्यानंतर जरांगे पाटलांनी छत्रपती घराण्याची विनंती मान्य केली. त्यांनी पाण्याचा घोट घेतला. छत्रपती घराण्याचा मान म्हणून आज पाणी घेत आहे. पण फक्त आजच्या दिवसच पाणी घेतो, असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं.

कोणी आलं तर ढकलत ढकलत गावाबाहेर काढा

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू झाल्यावर कोणत्याही नेत्याला भेटणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यांनी असेही म्हटले की, आम्ही तुमच्या दारात आलो नाही, तुम्ही आमच्या दारात येऊ नका. पण तरीही कोणी गावात आलं तर त्याला शांततेच्या मार्गाने मागे ढकलत ढकलत गावाबाहेर काढा, असं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -