घरमहाराष्ट्रराज्यात मराठा आरक्षणासाठी उठाव होण्याची गरज - अंबादास दानवे

राज्यात मराठा आरक्षणासाठी उठाव होण्याची गरज – अंबादास दानवे

Subscribe

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणासाठी उठाव होण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर दिली आहे. राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत देऊनही मराठा आरक्षणासंदर्भात कोणाताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा आमर उपोषणाला सुरुवात केली आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात अंबादास दानवे म्हणाले, “मराठा समजाला आरक्षण केंद्र सरकारच देऊ शकते. पण आरक्षणावरूच केंद्र सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. जर मराठा समाजाला आरक्षणासाठी राज्यातून उठाव होण्याची गरज आहे. या उठावा पुढे केंद्र सरकारला धुकावे लागेल, असेही अंबादास दानवेंनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 2024 मध्ये पुन्हा BJP सत्तेत येणार नाही; कुणी म्हटले असे? वाचा सविस्तर

मराठा समाजातील तरुणावरील गुन्हे

“मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीतील आरक्षण तर हवेच आहे आणि मराठा समाजातील तरुणावरील गुन्हे मागे घ्यावे. हे राज्य सरकार आज देखील करू शकते. पण सरकारला तसे करायचे नाही”, अशी टीकाही अंबादास दानवेंनी केली आहे. अंबादास दानवे म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊस असे म्हणतात आणि दुसरीकडे नारायण राणे, रामदास कदम आणि विजय शिवातरे यांच्यासारखी पिल्ले ही मराठा समाजावर सोडतात, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी उपोषण पुढे सुरूच ठेवावे, पण त्यांनी…; जरांगे पाटलांकडून संभाजीराजेंची विनंती मान्य

भविष्यात राजकारणात संधी मिळणार नाही म्हणून…

अंबादास दानवे निलेश राणेंच्या निवृत्तीवर म्हणाले, “भविष्यात राजकारणात निलेश राणेंना संधी मिळणार नाही, असे त्यांना वाटत असेल म्हणून निलेश राणेंनी स्थानिक राजकारणातून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त आहे. पण निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असे तर मला तर वाटत नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -