मित्राच्या डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलाने केला खून

मित्राच्या डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलाने केला खून

प्रातिनिधिक फोटो

किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने मित्राच्या डोक्यात दगड घालून तसेच तलवारीने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (दि.२९) सकाळी साडे नऊच्या सुमारास ताथवडे येथे ही घटना उघडकीस आली. दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने दोन तासात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. जुबेर गुलाब मुजावर (वय १९, रा. सपकाळ चाळ, सोनवणे वस्ती, ताथवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. दारु पिण्याच्या वादावरून हा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कसा घडला प्रकार

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुबेर व आरोपी हे मित्र होते. ते नेहमी दारू पिण्यासाठी एकत्र बसत असत. गुरुवारी रात्री ते ताथवडे बालाजी कॉलेज कडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर दारू पिण्यासाठी बसले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. रागाच्या भरात मुजावर याने मित्राला मारण्यासाठी तलवार उगारली. त्यावेळी आरोपी याने मुजावरच्या डोक्यात दगड मारून त्याला जखमी केले. त्यानंतर मुजावरची तलवार घेऊन त्याच्यावरच वार करून खून केला. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असता पोलीस यंत्रणा कामाला लागली.

First Published on: March 29, 2019 3:28 PM
Exit mobile version