पोलिसांवर दगडफेक करणार्‍या दरोडेखोरांना पोलीस कोठडी

पोलिसांवर दगडफेक करणार्‍या दरोडेखोरांना पोलीस कोठडी

घारगाव पोलिसांसह ग्रामस्थांवर दगडफेक करून हल्ला करणार्‍या चार दरोडेखोरांना गुरुवारी (दि.२२) न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जानकू लिंबाजी दुधवडे, संजय निवृत्ती दुधवडे, दत्तु बुधा केदार, राजू सुरेश खंडागळे, लिंबा दुधवडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळवाडी (बोटा)शिवारात पाचजण संशयास्पदरीत्या हालचाली करत असल्याचे घारगाव पोलिसांच्या गस्त घालणार्‍या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना दिली. त्यानंतर घारगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांना पाहून दरोडेखोर शेतात लपून बसले होते. सर्वांनी जीवाची पर्वा न करता दरोडेखोरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दरोडेखोरांनी पोलीस आणि गावकर्‍यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. या घटनेत श्रीकांत जठार व पोलीस कर्मचारी गणेश लोंढे जखमी झाले होते. पोलीस व गावकर्‍यांनी चार दरोडेखोरांना पकडले. त्यावेळी एकजण अंधाराचा गैरफायदा घेत पळून गेला. पोलिसांनी चौघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

First Published on: July 22, 2021 8:17 PM
Exit mobile version