मविआच्या महामोर्चाला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली, पण ‘या’ अटी-शर्थींसह!

मविआच्या महामोर्चाला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली, पण ‘या’ अटी-शर्थींसह!

मुंबई – महापुरुषांचा अपमान, महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अशा अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीने उद्या, १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चाला आधी परवानगी मिळाली नव्हती. मात्र, आता या महामोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास मिल ते जेजे ब्रिज मार्गे टाईम्स ऑफ इंडियापर्यंत या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. टाइम्सच्या इमारतीसमोर मविआतील नेत्यांची भाषणे होणार असल्याचं सांगण्यात येतंय. मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळाल्यास येथे सभा होईल.

हेही वाचा – ‘मविआ’च्या मोर्चाला परवानगी मिळालेली आहे; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील विविध समस्यांवरून महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा राणीबाग ते आझाद मैदान असा निघणार होता. मात्र, आता मार्ग बदलण्यात आला असून रिचर्डसन क्रुडास मिल ते टाईम्स ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी सर. जे.जे मार्ग नागपाडा अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभागाकडून परवानगी मागितली होती. पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी दिली आहे. या मोर्चाला आडकाठी केली जाणार नाही, असं कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा – महामोर्चाची तुलना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी, विरोध करणाऱ्यांना संजय राऊत म्हणाले…

पोलिसांनी काय नियम लावले?

First Published on: December 16, 2022 5:19 PM
Exit mobile version