घरमहाराष्ट्रमहामोर्चाची तुलना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी, विरोध करणाऱ्यांना संजय राऊत म्हणाले...

महामोर्चाची तुलना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी, विरोध करणाऱ्यांना संजय राऊत म्हणाले…

Subscribe

Sanyukta Maharashtra Movement | संयुक्त महाराष्ट्रावेळी असा लढा निघत होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणारा उद्याचा लढा असेल. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी असे सर्व पक्ष सहभागी होणार आहेत.

मुंबई – संयुक्त महाराष्ट्रासाठी असे लढे निघत असे. उद्या निघणारा महामोर्चा हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणारा लढा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत उद्याच्या मोर्चाची माहिती दिली. तसेच, भाजपावरही टीकास्त्र सोडलं.

हेही वाचा ‘मविआ’च्या मोर्चाला परवानगी मिळालेली आहे; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

- Advertisement -

आमची लढाई ही आणीबाणीविरोधात सुरू आहे. महाराष्ट्रात अन्याय सुरू आहे, सर्व महापुरुषांचा अवमान सुरू आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा रोज अपमान करतायत, उद्योग पळवले जात आहे. या सर्वांविरोधात महाराष्ट्रप्रेमी मोर्चा काढत आहेत. माझं आवाहन आहे की या मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्रावरील निष्ठा दाखवली पाहिजे. महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा बुलंद आवाज दिसणार आहे. घटनात्मक पदावर बसून महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. सर्व महापुरुषांचं महाराष्ट्राच्या मातीशी नातं आहे. नंतर ते विश्वाचे झाले, असं संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्रावेळी असा लढा निघत होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणारा उद्याचा लढा असेल. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी असे सर्व पक्ष सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा मविआ नेत्यांविरोधात भाजपचं उद्या माफी मांगो आंदोलन; आशिष शेलारांची घोषणा

दरम्यान, संजय राऊत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असं म्हटलं होतं. यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. या वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. या मागणीकरता भाजपाकडून उद्या माफी मागा आंदोलन करण्यात येणार आहे. यावर संजय राऊत म्हणाले की माझ्याविरोधात मोर्चा काढणं म्हणजे उद्याच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला विरोध करण्यासारखं आहे. भाजपाला वैफल्य आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यातील किड्यांचं संशोधन करावं लागेल, त्यांच्या डोक्यातील किडे शोधावे लागतील, असं संजय राऊत म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -