घरताज्या घडामोडी'मविआ'च्या मोर्चाला परवानगी मिळालेली आहे; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

‘मविआ’च्या मोर्चाला परवानगी मिळालेली आहे; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

Subscribe

राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध आणि त्यांना हटविण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांविरोधात महाविकास आघाडी शनिवारी मोर्चा काढणार आहे. मात्र, मविआच्या या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मविआच्या सरकारने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली.

राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध आणि त्यांना हटविण्यासाठी तसेच, महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांविरोधात महाविकास आघाडी शनिवारी मोर्चा काढणार आहे. मात्र, ‘मविआ’च्या या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ‘मविआ’च्या नेत्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘त्यांच्या मोर्चाला जी काही परवानगी हवी आहे, ती देण्यात आली आहे’, असे सांगितले. शिवाय, ‘मविआ’चा मोर्चा शांतपणे व्हावा, असेही सांगितले. (MVA march is permitted Explanation of Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “मविआचा मोर्चा शांतपणे व्हावा. त्या मोर्चाला जी काही परवानगी हवी आहे, ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मला वाटते की, लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल, तर ते विरोध करतील. फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे, यासाठीच केवळ सरकारचा हस्तक्षेप असले”

- Advertisement -

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी घोषणा केली आहे की, ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वारकरी-संत यांच्याबद्दल बोलत आहेत. राम-कृष्ण यांच्याबद्दल बोलत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलले जात आहे. त्यामुळे अशाप्रकाच्या ज्या गोष्टी होत आहेत, त्या गोष्टींच्या संदर्भात लोकांमध्ये संताप असून व्यक्त निश्चित करावा लागणार आहे”

“माझ्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या मार्गासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यांचा संपूर्ण मार्ग मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, परवानगीची अडचण असेल”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भेटीबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी “कोकण महामार्गाच्या संदर्भात राज ठाकरे यांनी माझी भेट घेतली होती”, असे सांगितले. तसेच, “कोकण महामार्गाचे काम अर्धवट आहे आणि नुकतेच ते तिकडून आले. तेव्हा ते म्हणाले की, तुम्हाला सांगवे की, हे काम वेगाने झाले पाहिजे. त्यावेळी मी त्यांना, नितिन गडकरी यांनी यासंदर्भाता पुढाकार घेतला असल्याचे सांगितले. तसेच, काही कत्रांटदारांचे अडथळे होते, तेही त्यांनी दूर केले आहेत. तसेच, ते स्वत: गडकरी यांच्याशी बोलणार असून, आम्हीही ते काम वेगाने कसे होईल त्याची पडताळणी करू”, असे सांगितले.


हेही वाचा – मविआ नेत्यांविरोधात भाजपचं उद्या माफी मांगो आंदोलन; आशिष शेलारांची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -