राजभवनात छातीत कळ आल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, राज्यपालांनी व्यक्त केले दुःख

राजभवनात छातीत कळ आल्याने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, राज्यपालांनी व्यक्त केले दुःख

राजभवनातील सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक विकास धोंडीराम भुजबळांचे निधन झाले. भुजबळ यांनी मुंबई आणि राज्यात अनेक ठिकाणी कर्तव्य बजाबले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे.

विकास भुजबळ कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व मनमिळावू अधिकारी होते. हसतमुख असलेल्या भुजबळांचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी स्नेहपूर्ण संबंध होता. त्यांच्या निधनामुळे आपण एका संवेदनशील पोलिस अधिकाऱ्याला मुकलो आहोत, या शब्दात राज्यपालांनी शोक व्यक्त केला.

बुधवारी दुपारी राजभवन परिसरात कार्यालयात असतानाच भुजबळ यांना छातीत दुखू लागले. इतर अधिकाऱ्यांनी त्यांना बॉम्बे रुग्णालयात नेले. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

मुंबईत दोन पोलिसांचे निधन –

दिवसभरात मुंबई पोलीस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याचा आणि एका पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने  मृत्यू झाला. लागोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे मुंबई पोलिसांवर शोककळा पसरली आहे. पोलीस हवालदार शरद पंढरीनाथ पवार (४९) हे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या मोबाईल 2 वर सोमवारी रात्रपाळीला कर्तव्यावर होते. रात्री 10 च्या सुमारास चर्चगेट पोलीस चौकी येथे ते सहकाऱ्यांसोबत जवेण करत असताना पवार यांना अचानक चक्कर आली होती. त्यानंतर त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा जीटी रुग्णालयात मृत्यू झाला.

First Published on: July 28, 2022 12:29 PM
Exit mobile version