कोल्हापूरात ४० जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई

कोल्हापूरात ४० जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई

कोल्हापूरमध्ये मटका अडड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांच्यावर हल्ला झाला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सुरक्षा रक्षकावर ही जीवघेणा हल्ला करण्यात आला. कुख्यात मटकाबुकी सलीम मुल्लाच्या यादवनगरमधील हा मटका हल्ला होता. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक तर ४० जाणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सहायक पोलिस ऐश्‍वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करणाऱ्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्‍याची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही पळवून नेण्यात आली होती. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी अटक केलेल्या विद्यमान नगरसेविका शमा मुल्ला त्यांचे पती सलीम मुल्ला व गुन्ह्यातील ४० संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिली.

या हल्ल्याप्रकरणी सलीम मुल्ला यांच्याबरोबर निलेश काळे, सुंदर रावसाहेब दाभाडे आणि जावेद मुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित निलेश काळे याने वरिष्ठ अधिकारी शर्मा यांचे सुरक्षा रक्षक निरंजन पाटील यांच्यावर हल्ला करून सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पळवून नेली होती. आतापर्यंत या प्रकरणी २५ जाणांना अटक करण्यात आली आहे.

First Published on: April 10, 2019 3:47 PM
Exit mobile version