मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी सकारात्मक मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी सकारात्मक मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

नाशिक : मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत लवकरच मुंबईत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथे जाहीर सभेत बोलतांना दिले. नारपारसह विभागीतील रखडलेल्या सर्व प्रकल्पांना गती देण्यात येईल. लोकं सरकारसाठी नव्हे, तर सरकार हे लोकांसाठी असले पाहिजे असे सांगत यापुढे प्रस्ताव, सही असे नाही तर उचलला फोन की झाले काम अशा पध्दतीने हे सरकार काम करेल असेही ते म्हणाले.]

शासन आपल्या दारी या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या दौर्‍यावर असून या दौर्‍याची सुरूवात त्यांनी मालेगाव येथून केली. यावेळी विभागीय बैठकीनंतर त्यांनी मालेगांव येथे आयोजित सभेला त्यांनी संबोधित केले. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या सुरूवातीपासूनच मालेगाव जिल्हा निर्मितीला पुन्हा एकदा चालना मिळाली त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या दौर्‍यात मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, सरकार स्थापन होऊन महिना झाला. गेल्या महिनाभरात सेना-भाजप युती सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. आमचं सरकार खोटं आश्वासन देण्याचे काम करणार नाही. कोणत्याही विषयावर पाहू, करू ,प्रस्ताव फाईलींचा प्रवास न करता फोन लावला की काम झाले पाहिजे अशा पध्दतीने हे सरकार काम करेल असे सांगत अधिकार्‍यांनो तयार राहा असेही ते म्हणाले.

मालेगावसह विभागातील सर्व प्रश्न, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गती देण्यात येईल. आजच झालेल्या विभागीय आढावा बैठकीत अनेक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम भागातील अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळण बंधार्‍यांमार्फत वळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालेगाव जिल्हा व्हावा ही मागणी बरयाच वर्षांपासूनची आहे. यासंदर्भात काही सूचनाही आल्या आहेत. प्रत्येक जिल्हयाच्या विकासात लोकप्रतिनिधींचा सहभाग असतो. त्यामुळे मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत लवकरच मुंबईत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. हॉकर्स, फेरीवाले, रिक्षाचालक, ट्रक ड्रायव्हर, टेम्पो चालकांसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी आमदार दादा भुसे यांनी केली. लवकरच हे महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासही त्यांनी यावेळी दिले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आपल्या पाठीशी उभे आहेत राज्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. त्यामुळे यापुढे राज्याच्या विकासासला गती देऊन रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले.

फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख

या दौर्‍यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मालेगांवमधील विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता पंतप्रधान म्हणून थेट देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आहे. ही बाब त्यांना लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असे नाव घेतले.

काय म्हणाले मुख्यमंत्री

First Published on: July 30, 2022 8:04 PM
Exit mobile version