आनंद दिघेंचे वाक्य वर्मी लागले? गद्दारांना क्षमा नाही, या संदेशाचे बॅनर उतरविले

आनंद दिघेंचे वाक्य वर्मी लागले? गद्दारांना क्षमा नाही, या संदेशाचे बॅनर उतरविले

बॅनरबाजीने राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगला असताना, पुन्हा राष्ट्रवादीने बॅनर लावून डीवचण्याचा प्रयत्न केला. तोच “खोका, बोका” या शीर्षकाखाली असलेल्या कवितेचे बॅनर रातोरात उतरविण्यात आले. कळव्यातील दक्ष नागरिक रवींद्र पोखरकर यांनी कवितेमधून “गद्दारांना क्षमा नाही” हा आनंद दिघे यांनी दिलेला संदेश बॅनरच्या माध्यमातून लावला होता.

ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मा.नगरसेवकांची खरेदी विक्री केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दक्ष नागरिक रवींद्र पोखरकर यांनी मागील रविवारी “नगरसेवकांनो,  स्वतःला विकू नका” असा संदेश लिहिलेले बॅनर लावले होते. या बॅनरची सबंध राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर लबाड बोका ढाँग करतोय! असे बॅनर लावून प्रतिउत्तर दिले. मंगळवारी रात्री उशिरा रवींद्र पोखरकर यांनी पुन्हा “खोका-बोका” असे शिर्षक असलेल्या कवितेचे बॅनर लावले. या बॅनरच्या माध्यमातून फुटणाऱ्या नगरसेवकांसह फोडाफोडी करणाऱ्यांवर वर्मी घाव घालण्यात आला आहे. हे बॅनर रात्री अकरा वाजेच्या सुमारास कळवा पूल आणि कळवा भागात लावण्यात आले होते. मात्र, आज सकाळीच हे बॅनर काढण्यात आले आहेत.

या संदर्भात रवींद्र पोखरकर यांनी, सध्या राज्यात जे गद्दारीचे सत्र सुरू आहे. त्यावर मी कवितेच्या माध्यमातून भाष्य केले होते. जनतेच्या मनात जे सुरू आहे. तेच मी बॅनरवरून व्यक्त करीत आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या हाताखाली मी देखील काम केले होते. त्यांनामी पक्षाशी केलेली गद्दारी कधीच सहन केली नव्हती.गद्दारांना माफी नाही, हा त्यांचा शब्द होता.  आता जे सुरू आहे. ते आनंद दिघे यांनाही रुचले नसते. त्यामुळेच त्यांच्या शब्दाची आठवण मी करून दिली होती. मात्र, ही आठवण गद्दारांच्या वर्मी बसली असल्यानेच त्यांनी हे फलक काढले आहेत. जरी त्यांनी फलक काढले असले तरी माझ्यासारख्या सामान्य कळवेकरांच्या मनात निर्माण झालेली चीड ते कशीकाय दूर करतील, असा सवाल केला.

काय होती कविता

म्हणताच खोका – बोका
चुकला काहींच्या हृदयाचा ठोका
पसरली एकदम अस्वस्थता
कारण, कळून चुकलेय
घालवून बसलोय लोकांची आस्था
एक काय लावला गळाला
त्यांना वाटले हात लागले आभाळाला
JA म्हणतच नाही त्याने केला विकास
आम्हीच म्हणतो कळवा होते भकास
त्याच्यामुळेच झाले झकास
दिघेसाहेबच सांगून गेले गद्दारांना क्षमा नाही
ठाणे-कळवेकर हे विसरणार नाही


हेही वाचा : मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाडामुळे दीड तास रेल्वे वाहतूक ठप्प


 

First Published on: February 1, 2023 6:13 PM
Exit mobile version