घरठाणेमालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाडामुळे दीड तास रेल्वे वाहतूक ठप्प

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाडामुळे दीड तास रेल्वे वाहतूक ठप्प

Subscribe

मध्य रेल्वेच्या आसनगाव – आटगाव दरम्यान मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास डाऊन मार्गावर मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने तब्बल दीड तास वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान एक कसारा लोकल रद्द करण्यात आली तर लांबपल्ल्याच्या गाड्यांचीही राखडपट्टी झाल्याने चाकरमानी प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागला. वासिंद रेल्वे स्थानकातून अन्य इंजिन उपलब्ध करण्यात आल्यानंतर तब्बल दीड तासाने तीन च्या सुमारास मालगाडी कसाऱ्याकडे रवाना झाली. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वारंवार अशा घटना घडत असल्याने चाकरमानी प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आसनगाव – आटगाव रेल्वे स्थानका दरम्यान डाऊन मार्गावर एका मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती. वासिंद स्थानकावरून अन्य इंजिन उपलब्ध केल्यानंतर तिनच्या सुमारास मालगाडी कसाऱ्याकडे रवाना झाली. या दरम्यान १ : २१ ची कसाऱ्याला जाणारी लोकल आसनगाव स्थानकात रद्द करण्यात आल्याने कसाऱ्याकडे जाणाऱ्या असंख्य चाकरमानी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. तर मालगाडीच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे आसनगाव स्थानकात थांबविण्यात आलेल्या जनशताब्दी एक्सप्रेस सह व वासिंद, खडवली स्थानकावर थांबविण्यात आलेल्या लांबपल्ल्याच्या गाड्यांचीही राखडपट्टी झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -