16 आमदार अपात्र ठरले तर नांदेड आणि लातूरकरांचा मार्ग फडणवीसांकडे.., प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

नांदेडमधील धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गट, भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सध्याच्या सरकारमधले 16 आमदार अपात्र ठरले तर नांदेडकर आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसायला तयार आहेत, असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

शिंदे सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यापैकी 16 आमदार अपात्र ठरले तर देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन बी तयार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, 16 आमदार बरखास्त झाले तर नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून मोठी टीका केली. राहुल गांधींचा उपक्रम चांगलाय, मात्र यातून फार काही हाती लागेल, अशी शक्यता कमी असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

काँग्रेसवाले म्हणत आहेत की, आमचं काय शिल्लक राहिलंय? त्यामुळे जे वाचलंय, ते वाचविण्यात हित पाहत आहेत, काँग्रेसमधील नितीमत्ता संपली आहे. दहापिढ्या बसून खातील इतकं त्यांच्याकडे आहे, असंही आंबेडकर म्हणाले.


हेही वाचा : आईवडिलांना शिव्या द्या पण मोदींना नको बोलणाऱ्यांविरोधात आपली लढाई, जयंत पाटलांची खोचक टीका


 

First Published on: November 5, 2022 9:03 PM
Exit mobile version