घरताज्या घडामोडीआईवडिलांना शिव्या द्या पण मोदींना नको बोलणाऱ्यांविरोधात आपली लढाई, जयंत पाटलांची खोचक...

आईवडिलांना शिव्या द्या पण मोदींना नको बोलणाऱ्यांविरोधात आपली लढाई, जयंत पाटलांची खोचक टीका

Subscribe

आम्हाला हिंदूत्व कुणाकडून शिकण्याची गरज नाही. आमचं हिंदूत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे असे सांगतानाच आपल्यात एकतेचा अभाव होता कामा नये. संकट आलं की पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहीजे. आत्मविश्वास ठेवा, कुठल्याही मंत्री किंवा आमदारांनी एवढ्या वर्षात चुकीचे कधी काम केले नाही. आपण कुणाशी लढणार आहोत याचे मार्गदर्शन दोन दिवस या शिबीरात झाले, आईवडिलांना शिव्या द्या पण मोदींना नको बोलणाऱ्यांविरोधात आपली लढाई आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केली.

राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीचे शिर्डीत दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर पार पडले. हॉस्पिटलमधून थेट शिर्डीत येत शरद पवारांनी मार्गदर्शन केले.शिस्तबद्ध पद्धतीने पक्षाला शक्ती देणारे शिबीर जयंत पाटलांनी आयोजित केले त्याबद्दल शरद पवारांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी जयंत पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि भाजपचा खरपुस समाचार घेतला.

- Advertisement -

भाजपच्या १०५ मध्ये अस्वस्थता आहे कारण हे सरकार ४० जणांसाठीच काम करत असल्याची भिती भाजप नेत्यांमध्ये आहे. आपण कुणाशी लढणार आहोत याचे मार्गदर्शन दोन दिवस या शिबीरात झाले. आईवडिलांना शिव्या द्या पण मोदींना नको बोलण्यांविरोधात आपली लढाई आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

सोयीचे असेल ते कसे वाजवायचे आणि आपण बोलतो तेच बाहेर वाजते. त्यांच्याविरोधात आपली लढाई आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का असं विचारणारा मंत्री या मंत्रिमंडळात आहे. हे कोणत्या पातळीवर आहेत लक्षात येत आहे. त्याविरोधात आपली लढाई असल्याचं पाटलांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा : बाळासाहेबांचं स्मारक फक्त संग्रहालय नाही तर स्फूर्तिस्थान – उद्धव ठाकरे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -