प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीला अर्पण केले ७२ तोळ्यांचे सोने, कारण माहितीय का?

प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीला अर्पण केले ७२ तोळ्यांचे सोने, कारण माहितीय का?

उस्मानाबाद – दोन्ही मुलांची लग्ने होऊन सगळं व्यवस्थित होऊ देत असा नवस आमदार प्रताप सरनाईक यांनी केला होता. हा नवस फेडण्यासाठी त्यांनी आज थेट उस्मानाबादमधील तुळजाभवानीचे मंदिर गाठले. आणि तब्बल ७२ तोळे सोने अर्पण करून नवस फेडला आहे. ७२ तोळे सोन्याची किंमत जवळपास ३८ लाख असल्याचं सांगण्यात येतंय. संपूर्ण सरनाईक कुटुंबाने तुळजाभवानी मंदिरात जाऊन नवस फेडला आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी भविष्य बघितल्याची चर्चा असलेले ‘कॅप्टन खरात’ नेमके कोण?

“तुळजाभवानी देवी आमची कुलदैवत आहे. दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळी आम्ही देवीला नवस बोललो होतो. आज माझ्या नातवंडांचं जावळ करायचं होतं. त्यामुळे नवस फेडण्यासाठी आम्ही सगळे कुटुंबीय देवीला आलेलो आहोत. ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्यांचा हार असा नवस मी देवीला बोललो होते. त्यानुसार आज सगळ्या कुटुंबाला घेऊन मी देवीचरणी लीन झालो. नवस फेडला”, अशा भावना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या.


प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, कोरोनाकाळात खूप निर्बंध होते. त्यामुळे तेव्हा यायला जमलं नाही. मधल्या काळात कुटुंबवर अनेक संकटे आलीत. त्यामुळे येथे यायला जमले नाही. मात्र, आज ठरवून आम्ही सर्व कुटुंबीय देवीला आलो आहोत. वर्षातून दोनवेळा तरी आम्ही देवीच्या दर्शनाला येतो, असंही सरनाईक म्हणाले.

हेही वाचा उद्योग-गावं पळवली, सरकार देवधर्म, तंत्र-मंत्र, ज्योतिषीमध्ये अडकले; संजय राऊतांचा घणाघात

पहिल्या मुलाच्या लग्नासाठी ५१ तोळ्यांच्या पादुका आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नासाठी २१ तोळ्यांचा हार असा नवस माझ्या पत्नीने केला होता. हे दागिने दोन वर्षांआधीच बनवून ठेवले होते. परंतु, मधल्या काळात कोरोनामुळे आम्हाला येता आलं नाही. त्यामुळे काल परवा येथे येण्याचं ठरवलं आणि आज येऊन आम्ही नवस फेडला आहे, असं प्रताप सरनाईक यांनी पुढे स्पष्ट केलं.

First Published on: November 24, 2022 12:26 PM
Exit mobile version