मी सर्वांना ऑक्सिजन देतो, माझ्यासाठी राऊत हेच ऑक्सिजन – सरनाईक

मी सर्वांना ऑक्सिजन देतो, माझ्यासाठी राऊत हेच ऑक्सिजन – सरनाईक

मी सर्वांना ऑक्सिजन देतो, माझ्यासाठी राऊत हेच ऑक्सिजन - सरनाईक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर पुन्हा एकदा खंत व्यक्त केली आहे. मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला आणि इतरांना ऑक्सिजन देण्याचे काम संजय राऊत करत असतात. ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांनी उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांनी गोकुळ अष्टमीच्या निमित्त या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण केलं आहे. प्रताप सरनाईक ठाण्यात दही हंडी उत्सवाचे मोठं आयोजन करत असतात मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी दहीहंडी आयोजित न करण्याचा निर्णय घेत ऑक्सिजन प्लांट उभारला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी दहीहंडीचे आयोजन न करता आरोग्य उत्सव अंतर्गत ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. या ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिसीद्वारे उद्घाटन केलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावल्यामुळे सरनाईकांनी आभार मानले आहेत. यावेळी प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे की, ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आलेल्यामुळे हा प्लांट आता कार्यरत करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांचे खासकरुन आभार मानले आहेत. “मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करत आहेत. आता ते इतरांनाही ऑक्सिजन देण्याचं काम करत आहेत” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दहीहंडी साजरी करणाऱ्यांना ऑक्सिजन लागेल – संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ऑक्सिजन प्लांट उभारल्यामुळे प्रताप सरनाईक यांचे कौतुक केलं आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा सण दहीहंडी आहे. मात्र या दहीहंडीच्या उत्सवावर कोरोनामुळे निर्बंध लागू केले असताना काही राजकीय पक्ष मात्र हट्टाने रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे ते कोरोनाला निमंत्रण असून त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कोरोना काळात आपण चांगलं काम केलं आहे. यामुळे संकटकाळी हेच पुण्याचे काम आपल्याला कामी येईल असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : आशीर्वाद कशाला हवेत, जनतेचा जीव घ्यायला?, मुख्यमंत्र्यांचा जन आशीर्वाद यात्रेवरुन हल्लाबोल


 

First Published on: August 31, 2021 4:24 PM
Exit mobile version