राष्ट्रपती रामनाथ कोविंद 27 मे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला पुणे दौऱ्यावर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 27 मे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला पुणे दौऱ्यावर

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पुण्यातील बुधवार पेठेत (Pune Budhwar Peth) असलेल्या कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या (Smt. Laxmibai Dagdusheth Halwai Datta Temple) शताब्दी राजा जयंती वर्षाचे उद्धाटन रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, देहूतील संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे अन् शिळा मंदिराचे पंतप्रधानांच्या लोकार्पण हस्ते होणार आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू (Dehu) इथे येणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता काळे (International bonsai expert Dr. Prajakta kale) यांचा सत्कार करण्यात येणार असून हा पुरस्कार सोहळा शुक्रवारी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. त्याचप्रमाणे त्याच्या दौऱ्यावेळी लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार फलोत्पादन क्रांतीचे जनक, रायझ अँड शाईन बायोटेकचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक तथा डॉ.डी.वाय.पाटील, अभिमत विद्यापीठ पिंपरीचे कुलगुरू भाग्यश्री पाटील, लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हेही वाचा – QUAD Summit 2022 : जपानी मुलाचे हिंदी ऐकून PM मोदी झाले अचंबित, विचारला ‘हा’ प्रश्न

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दत्त मंदिराच्या 125 वर्षांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या लक्ष्मीदत्त या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन होणार आहे.

येत्या 14 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर असणार असून, ते देहूमध्ये येणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे आणि शिळा मंदिराचे लोकार्पण त्याच्या हस्ते करण्यात येणार आहे. या लोकार्पणासाठी मार्च महिन्यात देहू संस्थानने नरेंद्र मोदी यांना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिले होते. त्यांच्या आमंत्रणाला मोदींना सकारात्मक प्रतिसाद देत येत्या 14 जूनची वेळ दिल्याची माहिती देहू संस्थानने दिली.


हेही वाचा – औवेसी यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले… मुघल सम्राटांच्या बायका कोण होत्या?

First Published on: May 24, 2022 8:35 PM
Exit mobile version