महाराष्ट्रातील तीन तुरुंग अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘सेवा पदक’ सन्मान

महाराष्ट्रातील तीन तुरुंग अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘सेवा पदक’ सन्मान

तुरुंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना 'सेवा पदक' सन्मान

देशातील ४० तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. स्वांतत्र्य दिनानिमित्त आज केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक प्रदान करण्यात येतात. तसेच प्रतिष्ठित सेवेसाठी देशातील तीन तुरुंग अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार शकील शेख यांना हे मानाचे सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर

याशिवाय, देशातील ३७ तुरुंग अधिकारी कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भायखळा जिल्हा कारागृहाचे सिपाई जितेंद्र काटे आणि कल्याण जिल्हा कारागृहाचे सिपाई अशोक ठाकूर यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.


हेही वाचा – तुरुंगातून पळण्यासाठी त्याने केला स्वत:च्याच मुलीचा वेष! ओळखणंही कठीण!


 

First Published on: August 14, 2019 7:12 PM
Exit mobile version