पंतप्रधान मोदी आज कर्नाटक आणि महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘असे’ असेल मुंबई भेटीचे नियोजन

पंतप्रधान मोदी आज कर्नाटक आणि महाराष्ट्र दौऱ्यावर, ‘असे’ असेल मुंबई भेटीचे नियोजन

Narendra Modi Mumbai Visit | नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. कर्नाटकात १०,८०० कोटी आणि महाराष्ट्रात ३८,८०० कोटींपेक्षा जास्त विकासकामाकांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रोड शोसुद्धा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे. त्यामुळे मुंबई दौऱ्यासाठी मोठी तयारी सुरू झाली आहे.

हेही वाचा मुंबईत आज ठिकठिकाणी नाकाबंदी, वाहतूक व्यवस्थेत बदल; मनस्ताप टाळण्यासाठी ‘ही’ बातमी वाचा

महिन्याभरात कर्नाटकात दुसरा दौरा

कर्नाटकात पंतप्रधान यादगीर आणि कलबुर्गी जिल्ह्यांत जाणार आहेत. दुपारी १२ वाजता यादगीर जिल्ह्यातील कोडेकल येथे सिंचन, पिण्याच्या पाण्यासंबंधित योजनांचं उद्घानट करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी २.१५ वाजता कलबुर्गी जिल्ह्यातील मलखेड येथे पोहोचतील. येथे ते नव्याने निर्माण झालेल्या राजस्व गावातील पात्र लाभार्थ्यांना टायटल डीड (हक्क पत्र) वितरीत करणार आहेत. तसंच, एका राष्ट्रीय महामार्गाचंही लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्यातील हा दुसरा कर्नाटक दौरा असणार आहे. याआधी ते राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने हुबळी येथे गेले होते. यावेळी एक रोड शो सुद्धा झाला होता.

मुंबईत होणार रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत येतील. तर, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबई मेट्रो मार्ग २ए आणि ७ चं उद्घाटन करणार आहेत. तसंच, या मेट्रोमधून ते प्रवाससुद्धा करणार आहेत.

मुंबईत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. या रोड शोमध्ये जवळपास एक लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अशावेळी होत आहे ज्यावेळी मुंबईसहित अनेक महापालिकांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे मोदींचा हा दौरा मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची नांदी ठरणार आहे.

मोदींचा असा असेल मुंबई दौरा

First Published on: January 19, 2023 8:16 AM
Exit mobile version