Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारणार का?, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

Maharashtra Assembly Winter Session 2021: विधानसभेचे अध्यक्षपद स्वीकारणार का?, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

राज्यात हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. परंतु अद्यापही विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आलेली नाहीये. मात्र, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे आणि के.सी. पाडवी यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. परंतु विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत पृथ्वीराज चव्हाणांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिली आहे.

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी प्रश्न विचारला असता त्यांनी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया चव्हाणांनी दिली आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव अग्रस्थानी असल्याची चर्चा जोरदार रंगत आहे.

कामगार सल्लागार समितीची आज शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम ठरला. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या २७ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. नवा अध्यक्ष कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदी अनुभवी व्यक्तीला असलं पाहीजे – नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाबाबत पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदासाठी आजपासूनच प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तसेच २७ किंवा २८ तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवड होईल. विधानसभा अध्यक्षपदासाठी हाय कमांड आता निर्णय घेणार असून पुढील २ दिवसांमध्ये त्याबाबत आपल्याला माहिती मिळेल, अशी माहिती नाना पटोलेंनी दिली.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता – नवाब


 

First Published on: December 24, 2021 2:46 PM
Exit mobile version