काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ; Money Laundering प्रकरणी न्यायालयाने बजावला समन्स

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ; Money Laundering प्रकरणी न्यायालयाने बजावला समन्स

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ; Money Laundering प्रकरणी न्यायालयाने बजावला समन्स

मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस (Congress) नेते डीके शिवकुमार (K Shivakumar) यांना दिल्ली न्यायलायने मंगळवारी समन्स बजावला आहे. तसेच त्यांच्याशी संबंधितांनाही न्यायालयाने समन्स जारी केला आहे. 2018 मध्ये डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी शिवकुमार यांना 1 जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेष सरकारी वकील नितेश राणा यांच्यामार्फत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवकुमार आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने हा आदेश दिला आहे. (Money Laundering Case)

काँग्रेसच्या कर्नाटक युनिटचे अध्यक्ष शिवकुमार यांना ईडीने ३ सप्टेंबर २०१९ रोजी अटक केली, मात्र दिल्ली न्यायालयातून त्यांना २३ ऑक्टोबर २०१९ रोजी जामीन मिळाला. यावेळी डीके शिवकुमार यांनी आपल्यावरील आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. यावेळी ईडीने या प्रकरणी शिवकुमार यांची मुलगी ऐश्वर्या आणि काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यसह अनेकांची चौकशी केली होती.

शिवकुमार यांच्यावर नेमके कोणते आरोप?

आयकर विभागाने गेल्या आठवड्यात बेंगळुरु येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रावर आधारित आहे. आयकर विभागाने शिवकुमार आणि इतरांवर कथित करचोरी आणि “हवाला” च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचा आरोप लावला आहे. यापूर्वीही २०१७ मध्ये डी. के. शिवकुमार यांच्या ६४ ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. दरम्यान, या छाप्यांचा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंध नसल्याचे शिवकुमार यांनी म्हटले होते.


उमर खालिदचे भाषण आक्षेपार्ह असले तरी ते दहशतवादी कृत्य नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचं मत


First Published on: May 31, 2022 6:47 PM
Exit mobile version