पुणे : महापालिकेत थुंकणाऱ्या ११ जणांवर कारवाई

पुणे : महापालिकेत थुंकणाऱ्या ११ जणांवर कारवाई

पुणे : महापालिकेत थुंकणाऱ्या ११ जणांवर कारवाई

पुणे महापालिका इमारतीच्या परिसरात थुंकणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी ११ जणांवर दंडात्मक कारवाई करुन प्रत्येकाकडून १५० रुपये प्रमाणे १ हजार ६५० रुपये वसुल केले आहे. सह-आयुक्त आणि घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी ही माहिती दिली आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, लघवी करणाऱ्या आणि कचरा टिकून घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहीमेमुळे घाण करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक

या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. पालिकेच्या मुख्य इमारतीसह विविध क्षेत्रीय कार्यालये आणि पालिकेच्या इतर कार्यालयांमध्ये पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी पान, तंबाखूसह गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे अस्वच्छेचे सांम्राज्य पसरले आहे. त्यामुळे शहरात कारवाई मोहीम राबवून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर टिका केली जात होती. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने मुख्य इमारतीसह स्वमालकीच्या विविध इमारतीत घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आणि घाण करणऱ्यांवर करडी नजर ठेवून कारवाई करण्यासाठी पाच जणांचे स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.


हेही वाचा – पुणे विभागात ९८६ किडनी, ३७६ लिव्हर, १५ हार्टची गरज

First Published on: December 5, 2018 4:52 PM
Exit mobile version