पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांसह पाच तहसीलदारांच्या बदल्या

पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांसह पाच तहसीलदारांच्या बदल्या

पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांसह पाच तहसीलदारांच्या बदल्या

कोरोनाच्या संकट काळात पुण्याच्या जिल्हाधिकारीऱ्यांच्या खुर्चीवर कोण बसणार यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान पुणे विभागातील चार उपजिल्हाधिकारी आणि पाच तहसीलदारांची बदली झाली आहे. पुणे जिह्याच्या उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांची नियुक्ती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल विभागात करण्यात आली आहे. तर अन्नधान्य वितरण आधिकारी म्हणून भुदरगडचे उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण अद्याप जिल्हााधिकारी पदावर कुणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही आहे.

साताऱ्यातील पुनर्वसन अधिकारी म्हणून कोरेगावरच्या उपविभागीय अधिकारी कीर्ती नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोरेगावच्या उपविभागीय अधिकारी पदी सोलापुरच्या उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांची नियुक्त करण्यात आले आहे.

या पाच तहसीलदारांची बदली

सोलापुरमधील जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून पुण्याच्या पुनर्वसन कार्यालयातील तहसीलदार विवेक साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली. तर सातारा येथील पुनर्वसन तहसीलदार शुभांगी फुले यांनी पुण्यातील सर्वसाधारण शाखेर नियुक्ती झाली आहे. तसेच सोलापुरच्या सर्वसाधरण शाखेत आटपाडीचे तहसीलदार सचिन लंगुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील पुनर्वसन कार्यालयातील तहसीलदार सुरेखा दिवटे यांची विभागीय आयुक्त कार्यालयामधील पुनवर्सन कार्यालयात नियुक्त झाल्या आहेत. तर उपप्रबंधक एमआरटी तहसीलदार दिगंबर रौंदळ यांना याच पदावर मुदतवाढ मिळाली.


हेही वाचा – Pune Corona: पुण्यात १,२४० जण कोरोनामुक्त; ९२४ नव्या रूग्णांची नोंद


 

First Published on: August 12, 2020 2:02 PM
Exit mobile version