घरमहाराष्ट्रPune Corona: पुण्यात १,२४० जण कोरोनामुक्त; ९२४ नव्या रूग्णांची नोंद

Pune Corona: पुण्यात १,२४० जण कोरोनामुक्त; ९२४ नव्या रूग्णांची नोंद

Subscribe

आज दिवसभरात ९२४ कोरोनाबाधित आढळले असून शहरातील उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १४ हजार ७०५ इतकी झाली आहे. तर आज ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू

पुणे शहरात आज दिवसभरात ९२४ कोरोनाबाधित आढळले असून शहरातील उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १४ हजार ७०५ इतकी झाली आहे. तर आज ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ७३५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते़ यापैकी ४४३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ४८० रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.

आज ५ हजार ३२० कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत, पुणे शहरात आतापर्यंत एकूण ३ लाख ३० हजार ४१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकूण ६७ हजार ६५१ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत, तर १४ हजार ७०५ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, आजपर्यंत शहरात एकूण ६७ हजार ६५१ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १५ हजार ९३ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ५१ हजार ३५३ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ५९३ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.


कोरोनाच्या भीतीमुळे अवयवदानात तिप्पटीने घट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -