जुन्नरमध्ये एसटी बस आणि इको कारची जोरदार धडक; एका प्रवाशाचा मृत्यू

जुन्नरमध्ये एसटी बस आणि इको कारची जोरदार धडक; एका प्रवाशाचा मृत्यू

एसटी बस आणि इको कारमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना जुन्नरमध्ये घडली आहे. या अपघातात एका ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच, ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune junnar road accident msrtc bus and maruti suzuki eco car at nagar kalyan highway)

मिळालेल्या माहितीनुसार, नगर कल्याण (Nagar-Kalyan Highway) महागमार्गावर भीषण अपघात झाला. एसटी बस (msrtc bus) आणि इको कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता.

या अपघातानंतर अहमदनगर-कल्याण महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. रात्री झालेल्या अपघातामुळे बचावकार्य करतानाही अडथळा येत होता. दरम्यान, स्थानिकांनी तातडीनं अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेतली आणि मदतकार्य केलं आहे.

नेमका हा अपघातात चूक कुणाची होती, हे कळू शकलेले नाही. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे. अशातच पावसात दृश्यमानता कमी होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहने हाकतात अधिक सतर्कता बाळगावी आणि पावसात वाहनं वेगानं हाकू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.


हेही वाचा – ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

First Published on: July 12, 2022 9:40 AM
Exit mobile version