MPSC विद्यार्थ्यांचे आज राज्यभरात आंदोलन, नव्या परीक्षा पॅटर्नविरोधात उतरले रस्त्यावर

MPSC विद्यार्थ्यांचे आज राज्यभरात आंदोलन, नव्या परीक्षा पॅटर्नविरोधात उतरले रस्त्यावर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केल आहे. एमपीएस परीक्षेसाठी लागू केलेल्या नव्या पॅटर्नविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे, मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पुण्यात सुरु असलेल्या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकाराही सहभागी झाले आहेत. या पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे. यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. परीक्षेचा हा नवा पॅर्टन (2023) याच वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षेचा नवा पॅर्टन मान्य नसून त्याविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात येत आहे. दरम्यान मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरातील अनेक विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

दरम्यान एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न लागू केल्यास सध्याच्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शेवटच्या दोनचं संधी मिळणार आहेत. त्यामुळे हा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या या मागणीवर आता सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. हे पाहणे महत्वाचं असणार आहे.

पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी देखील विद्यार्थी करत आहेत.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

१) MPSC परीक्षांचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा.

२) नवा पॅटर्न लागू करण्यासाठी प्रशासनाने घाई करु नये.

३) अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिन्यांचा अवधी मिळावा.

४) नवा अभ्यासक्रम UPSC च्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने त्याबाबत पुस्तक उपलब्ध करुन द्यावी.


नेत्यावर बोट उचलण्यासारखं नसतं तेव्हा बायकोच्या मागे लागतात; अमृता फडणवीसांचं विरोधकांना सडेतोड उत्तर

First Published on: January 13, 2023 1:10 PM
Exit mobile version