घरमहाराष्ट्रनेत्यावर बोट उचलण्यासारखं नसतं तेव्हा बायकोच्या मागे लागतात; अमृता फडणवीसांचं विरोधकांना सडेतोड उत्तर

नेत्यावर बोट उचलण्यासारखं नसतं तेव्हा बायकोच्या मागे लागतात; अमृता फडणवीसांचं विरोधकांना सडेतोड उत्तर

Subscribe

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या स्टाईल स्टेटमेंट, राजकीय स्टेटमेंट आणि विशेषत: त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. अशात अमृता फडणवीस यांचं एक नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं सोशल मीडियावर चांगलचं फेमस होत आहे. अमृता फडणवीसांनी पहिल्यांदाच पंजाबी भाषेत हे गाणं गायलं आहे. मात्र या गाण्याला सोशल मीडियावर हिट मिळतेय त्याचप्रमाणे ट्रोलही केलं जात आहे. याच ट्रोलिंगला अमृता फडणवीसांनी आपल्या भाषेत सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच ट्रोलिंग करणारी लोकं विरोधी पक्षातील असल्याचे म्हणत त्यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस राजकारणात आहेत, त्यांच्यावर बोलण्यासाठी विरोधकांकडे काहीही नाही, त्यामुळे ते माझ्यावर टीका करतात, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीस काल टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

- Advertisement -

यावेळी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत अमृता फडणवीस म्हणाल्या की, जेव्हा एखाद्या नेत्यावर ताणण्यालायक काही दिसत नाही. तेव्हा खूपदा त्यांच्या बायकोच्या मागे लागतात. विरोधक तेच करत आहेत. त्यांनी माझ्या या गाण्यालाही सोडलं नाही. ते ठीक आहे. पण त्यांनी माझ्या भजनालाही ट्रोल केलं असतं. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय पदामुळे हे केलं जात आहे, हे मला माहीत आहे. आता मला ट्रोलिंगची सवय झाली आहे, मी सातत्याने माझं काम करत आहे. याचा मला आनंद आहे, माझ्या गाण्याला लोकांची पसंतीही वाढतेय. असं म्हणत अमृता फडणवीसांना विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्त्री ही एक शक्ती आहे आणि स्त्री शक्तीसाठी माझं लवकरचं एक नवं गाणं येत आहे. ते गाणं मी म्हणणार आहे आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे गाणं मी प्रदर्शित करणार आहे. अशी माहितीही अमृता फडणवीस यांनी दिली आहे.


पाण्यासाठी रस्त्यांची वाट लावणाऱ्यांवर वरदहस्त कोणाचा?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -