आता कमी खर्चात होणार मुंबई-पुणे ‘शिवनेरी’चा प्रवास; वाचा सविस्तर…

आता कमी खर्चात होणार मुंबई-पुणे ‘शिवनेरी’चा प्रवास; वाचा सविस्तर…

सुट्ट्यांमध्ये प्रवास करायचा असला की सर्वात महत्वाचे असते महिन्याचे बजेट. महिन्याच्या बजेटबरोबर त्याचसोबत प्रवासाचा खर्च आपल्या मनात घुमू लागतो. वाहतूक, खाणेपिणे, हॉटेल, खरेदी इत्यादी खर्चाचा विचार करून बरेच लोक फिरायला जाण्याचा बेत रद्द करतात. अशा परिस्थितीत आता मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच अतिशय कमी खर्चात तुम्हाला मुंबई-पुणे प्रवास करता येणार आहे.

पुणे-मुंबई दरम्यान रोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. रेल्वेमध्ये आरक्षण उपलब्ध नसणे किंवा सोयीच्या भागात बस जात असल्यामुळे अनेक जण बस प्रवासाला प्राधान्य देतात. एकीकडे सर्व महागाई वाढत असताना पुणे-मुंबई प्रवास स्वस्त होणार आहे. एसटी महामंडळात शिवाई इलेक्ट्रिक बसेसनंतर आता इंधनावर धावणाऱ्या शिवनेरी बसेस बदलवून ई – बसेस आणल्या जाणार आहे. बुधवारी पुण्यात ८ इलेक्ट्रिक बसेस आरटीओ मध्ये दाखल झाल्या असून, एप्रिल अखेर पर्यंत मुंबईत सुद्धा इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहे. इंधनावरील धावणाऱ्या शिवनेरीच्या तुलनेत ई बस शिवनेरीचे भाडे स्वस्त असेल अशी माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. या निर्णयामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे.

मुंबई-पुणे मार्गावर ईलेक्ट्रिक एसटी बस अर्थात ‘ई-शिवनेरी’ सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १ मेपासून ई-शिवनेरी प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. या ई-शिवनेरीचे तिकीट दर सध्याच्या तिकीट दराच्या तुलनेत कमी असतील. डिझेलच्या तुलनेत ईलेक्ट्रिक बसचा परिचालन खर्च कमी आहे.

एसटीच्या ताफ्यात स्वामालकीच्या आणि कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सुमारे २०० बसेस सध्या सेवेत आहे. या सर्व शिवशाही बसेस दुसऱ्या मार्गावर सोडून याठिकाणी इलेक्ट्रिक बसेस भविष्यात धावणार आहे. नव्याने येणाऱ्या सर्व १०० इलेक्ट्रिक बसेस मुंबई पुणे महामार्गावर सोडण्यात येणार आहे. या बसेस सुमारे ३५० किलोमिटर पर्यंत धावू शकणारे चार्जिंग क्षमता राहणार आहे. शिवाय, मुंबई पुणे महामार्गावर चार्जिंग स्टेशन सुद्धा बसवण्यात आले असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

First Published on: April 20, 2023 4:56 PM
Exit mobile version