डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर आणि भावेंच्या कोठडीत वाढ

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर आणि भावेंच्या कोठडीत वाढ

डॉ. नरेंद्र दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज दोघांना देखील पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. न्यायालयाने देखील दोघांच्या कोठडीमध्ये ४ जूनपर्यंत वाढ केली आहे. शनिवारी मुंबईतून संजीव पुनाळेकर आणि विक्रम भाने यांना सीबीआयने अटक केली होती.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात वकील संजीव पुनाळकर आणि विक्रम भावे हे आरोपी असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचा आरोप आहे. तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत

संजीव पुनाळेकर हे सनातन संस्थेचे वकील असून दाभोलकर हत्याप्रकरणात ते मुंबई मुंबई उच्च न्यायालयात सनातनची बाजू मांडत आहेत. तसेच, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींच्या जबानीतून देखील पुनाळेकरांचे नाव समोर आले होते. तर विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात या दोघांना अटक करत सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. दोघांची देखील सीबीआयकडून चौकशी सुरु आहे.

हेही वाचा – 

नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकर, विक्रम भावेंना अखेर अटक

First Published on: June 1, 2019 4:16 PM
Exit mobile version