चक्क पोलीसालाच दिली नोकरी घालवण्याची धमकी

चक्क पोलीसालाच दिली नोकरी घालवण्याची धमकी

भांडणाची तक्रार नंतर लिहून घेतल्याच्या रागातून एका पट्टाने चक्क पोलिसालाच थेट नोकरी घालविण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी कोखरुड पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. एरंडवणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आरोपीने भांडणाची तक्रार परस्परविरोधात लिहून घेतल्याने पोलिसाला नोकरी घालवण्याची धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी आरोपी राहुल भरम (काळेवाडी, कोथरुड) याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी कौस्तुभ निढाळकर यांनी धमकी देणाऱ्या आरोपीविरोधात तक्रार दिली. तक्रारदार निढाळकर हे कोथरुड पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत आहे. राहुल भमर आमि राहुल वाघ यांच्यात काही कारणावरुन भांडणे झाली होती. या भांडणानंतर दोघेही परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यासाठी एरंडवणा पोलीस ठाणे गाठले. यावेळी ड्युटीवर असलेले अंमलदार निढाळकर प्रथम राहुल वाघ यांची तक्रार लिहून घेत होते. परंतु राहुल वाघची तक्रार लिहून घेईपर्यंत राहूल भरला बाजूला बसण्यास सांगितले. याचा भरमा राग आला. याच रागाच्या भरात राहुल भरमने अंमलदार निढाळकर यांनी त्याची काय अगोदर तक्रार लिहून घेताय, तुम्ही मला बाजूला बसण्यास काय सांगता ? मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे काय? तुमची मी नोकरी घालवीन’ अशा प्रकारे धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणात निढाळकर यांनी आरोपी राहुल भरमला जाब विचारल्यानंतर वाद आणखी वाढला. त्यानंतर अंमलदार निढाळकर यांनी राहुल भरमविरोधात शिवीगाळ, धक्काबुक्की करण्याबरोबर सरकारी कामात अडधळा आणत जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनंतर आरोपी भरमला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाय. बी. पडवळे करीत आहेत.

First Published on: January 18, 2021 12:32 PM
Exit mobile version